
लेखक :- तुषार गजानन भुसारी. contact :- 8432265548, 20/Jan2022,गुरुवार. पूर्ण स्टोरी वाचा तेव्हाच लक्षात येईल आपल्या 🙏.
सकाळी-सकाळी आई चा आवाज कानावर पडला, तू अजून उठला नाही का रे तुषार. तुला रोज-रोज, तेच-तेच काय सांगायला लागत का लवकर उठायला जमत नाही का तुला . मी आई फक्त पाच मिनिटे झोपतो आणि उठतो मग असं मी आईला प्रतिउत्तर दिलं पण ती ऐकणार तर ना तिने लगेच स्वयंपाक रूम मध्ये काम करत असणाऱ्या माझ्या बायकोला आवाज दिला का ग स्नेहल तुला तुझ्या नवऱ्याला उठवायला जमत नाही का मी ओरडून-ओरडून थकले पण तो कुंभकर्ण काही उठायचं नाव नाही घेत .

आई च बोलणं ऐकताच बायकोने आवाज दिला का हो उठताय का येऊ उठवायला तिचे शब्द कानावर पडायच्या आत मी खाटेवर उठून बसलो होतो. बायको आल्यावर कशी उठवते ना याचा मी खूप अनुभव घेतला होता म्हणून , उठल्या नंतर लगेच तोंड स्वच्छ करून हॉल रूम मध्ये आलो तर ,
तिथे माझी मोठी मुलगी तृप्ती संगणका वर Goldie Princess: Skin Doctor नावाचा खेळ खेळत बसली होती तर माझा छोटा मुलगा आर्यन मोबाईल मध्ये car racing चा खेळ खेळत बसला होता. मी लगेच त्या दोघांच्या गालावर एक-एक पप्पी दिली आणि त्यांना विचारलं का रे नाश्ता केलास ना तर तर तृप्ती म्हणाली हो बाबा मी केला आणि आर्यन काहीच बोलला नाही खेळा मध्ये गुंग होता बहुतेक .

मी अंघोळ करून नाष्टा केला आणि आई ला आवाज दिला आई मी शेतात चाललोय माझा जेवणाचा डबा पाठवून दे शेतातच हे ऐकताच , माझी बायको का हो तुम्ही घरी नाही येणार का जेवायला तर मी बोललो नाही येणार , आज बहुतेक पाणी पडणार वाटतंय तर पाणी पडायच्या आत माळा वरील शेतातील नाल तेवढं खोदून घेतो नामु कडून , (नामु आमचा साल गडी बरका), बायको बरं-बरं. मग मी ही आपला बूट घालून नामु च्या घरी त्याला बोलण्यासाठी गेलो.
मी मामी नामु मामा आहे का घरी , मी आलो अस सांगा त्याला बोलणार तेवढ्यात मामीच सांगायला लागली की त्यांची तब्बेत बरोबर नाही आहे , आज ते कामा वर येणार नाही आहेत . मी बरं- बरं, काय झाले त्याला मामी म्हणाली अंग गरम लागतंय बहुतेक ताप आलेला असावा त्यांना . मी बरं, पण मामा ला डॉक्टर कडे पाठवा आणि पैसे नसेल तर बाबांकडून घ्या ते घरीच आहे असं बोलून मी आपल्या शेताच्या वाटेने लागलो .

शेत गावा पासून एक किलोमीटर दूर असेल .शेतात पोहचल्यावर आपलं ठरलेलं काम पूर्ण केलं . माझी न्याहरी ही घरून आली होती मग जेवण ही केलं . थोडा वेळ गोधणीच्या झाडाखाली आराम केला. सकाळी वाटलं होतं पाणी येईल तसं तो ही सुरू झाला पण थोडा कमी होता म्हणून जोराने सुरू होण्याअगोदर मी घरी जाण्याचा निर्णय केला . आपल आज च काम पूर्ण झालं आणि आता सोयाबीनच नुकसान होणार नाही याचा आनंद मात्र चेहऱ्यावर दिसत होता माझ्या .
विचार करता-करता समजलेच नाही आपण गावाच्या अगदी जवळ आलो आहे . गावातील घरेही नजरेला पडत होते पण काय अचानक वीज कडकली इतका भयंकर आवाज होता की माझ्या काळजाच अक्षरशः पाणी-पाणी झाले , जोराने पाणी सुरू झाला . आसर्यासाठी नजर भिरकावली तर एक दाट , जणू ढगांन सोबत बोलत असणार इतका विशाल (उंच ,मोठा ). मोठं-मोठ्या फांद्या नजरेत मावणार नाही असे ते वडाचे झाड नजरेला पडले आणि पळत मी अगदी त्यांच्या कुशीत (मूळ खोडाजवळ) जाऊन उभा रायलो . मला पाणी लागायचं एकदम बंदच झालं . आपल्या अंगातील ओल-चिंब झालेलं कुर्ता मी बाहेर काढला व त्याला पिळून त्यातील पाणी बाहेर काढू लागलो .

अचानक मला कोणी तरी मागून आवाज दिला असं वाटल मागे वळून बघितले तर कोणीच नव्हते , भास झाला असावा म्हणून दुर्लक्ष केलं पण काय पुन्हा तोच आवाजकानावर पडला काय चाललंय तुषार , आता मात्र मी स्पष्ट पने ऐकले की मला माझ्या नावाने कोणी तरी हाक मारत आहे मी लगेच चारही दिशेला नजर टाकली पण कोणीच दिसले नाही. मुंजे, समंध हे प्रामुख्याने पिंपळ, वड, उंबर अशा झाडांवर वास करतात. हे कुठं तरी ऐकलं होतं तसा माझा विश्वास नाही असल्या गोष्टी वर पण आजूबाजूला कोणी नाही तर मनात शंका आली , भीती वाटायला सुरवात झाली .
राम-राम शब्दाचा जप सुरू झाला . येरवी देवाचं द्यानही न काढणार मी आता मात्र राम नामाचा जप जपत बसलो होतो . तेवढ्यात पुन्हा आवाज आला अरे घाबतोस का तुषार . मी लगेच कोण आपण प्रश्न केला तर समोरून आवाज आला अरे तू माझ्या अंगा खांद्यावर खेळलास ,माझ्या सावलीत कधी विटी-दांडू तर कधी लगोरी, पकडा-पकडी असे अनेक खेळ खेळलास लहानाचा मोठा झालास .पुन्हा मी तोच प्रश्न पुन्हा विचारला त्यावर उत्तर आलं तू ज्याच्या कुशीत उभा आहे तो मी तुम्ही वड या नावाने हाक मारता मला , मी जोऱ्याने वड कसं शक्य आहे झाड कधी बोलत का? प्रश्न केला . का विश्वास बसत नाही आहे का , तुला आठवतेय तू लहान होतास तेव्हा माझ्या मुळ्याना लटकून झोका खेळायचास एकदा तर तुझा हात माझ्या मुळ्या वरून घसरला आणि तू फटकन जमिनीवर पडलास किती लागले होते तुला तेव्हा. मला पटकन ही घटना आठवली आणि विश्वास ही बसला की नक्की जो आपल्या सोबत बोलत आहे ते वडाचेझाड असावे मग , मी आणि वड असेच आमच्या बालपणीच्या गोष्टी मध्ये रमून गेलो .

खूप वेळ झाला होता पाणी ही थांबला होता बोलत असताना मला जाणवले की वडाचे झाड दुःखी दिसत आहे मी त्याला विचारले सगळं बरं आहे ना . जसा मी प्रश्न विचारला त्यावर वडाचे झाड मला म्हणाले की , मला काय झाले मी तर तर चांगलाच आहे पण आज काल च्या पोरांना काय झालं काय माहित आता कोणीही माझ्या अंगाखांद्यावर खेळत नाही , ना माझ्या सावलीत आता कोणी विटी-दांडू खेळतो ऐकट-ऐकट वाटतं बघ तुषार मला . यावर काय बोलावं आणि काय सांगावं काहीच कळत नव्हते मला, आपले मुलं मोबाईल मध्ये सतत game खेळत असतात हे तरी कसं सांगू मी त्याला . त्यांना मोबाईल घेऊन देणारा ही मीच आणि खेळ खेळायला शिकवरणारा ही मीच , कसं सांगणार ना ?… रात्र खूप झाली आहे माझे मुलं वाट बघत बसले असेन असं खोटं कारण सांगून मी तेथून निघून गेलो .
मी घरी आलो बघतो तर आर्यन मोबाईल मध्ये खेळ खेळत बसला होता कधीही मला त्यांचा राग येत नव्हता पण त्यांच्या हातात मोबाईल बघून आज मात्र मला राग आला पण मी तो राग न दाखवता आर्यन मोबाईल दे मला अर्जंट कॉल करायचा आहे असं सांगून मोबाइल घेतला . रूम मध्ये जाऊन कपडे बदलले आणि खाटेवर शांत लेटलो , ते वडाचे झाड आणि त्याचं ते दुःखी असण्याचं कारण ह्या दोन्ही गोष्टी डोक्यामध्ये घुमत होत्या . पटकन डोक्यात एक छान कल्पना आली आणि पटदिशा खाटेवरून उतरलो आणि माझा मित्र गोलू याच्या घरी गेलो. त्याला झालेला सर्व प्रकार मी सांगितल्या आणि सुचलेली कल्पनाही, आपल्या सर्व मित्रांना पण सांग असे बोलून मी घरी निघून आलो.

रात्री ठरल्या प्रमाणे आम्ही सर्व मित्र आप- आपल्या मुलांना घेऊन त्या वडाच्या झाडाखाली जमलो होतो. आर्यन मला सारखं विचारत होता पप्पा आपण इकडे का आलोय ? पण त्याला उत्तर देणं मला महत्वाचं वाटलं नाही . आम्ही सर्व मित्रांनी लगोरी खेळायला सुरू केलं . आमचे मुलं जवळचं बसून आम्हाला खेळतांना बघत होते. थोड्या वेळाने आर्यन पळत माझ्याकडे आला पप्पा मला ही खेळायच आहे तुमच्यात हे ऐकताच सर्व मुलं मला ही मला ही अस आरडाओरडा करत पळत सुटली . मग आम्ही त्यांनाही आमच्या टीम मध्ये घेतलं . खूप वेळ आम्ही लगोरी खेळलो वडाच्या सावलीत . मुलंही खेळून खूप दमली होती . आपण पुन्हा उद्या सकाळी खेळू असं मी त्यांना म्हटलं तर त्या वर खुश होऊन मुलं जोर-जोऱ्याने हे….असं एकमेकांकडे बघून आरडाओरडा करू लागले .
आम्ही घराच्या वाटेला लागलो मी मागे वडाच्या झाडाकडे वळून बघितले तर फांद्या वाऱ्याने हलत होत्या जणू ते वडाचे झाड आम्हाला बाय-बाय करत आहे असं मला वाटलं . घरी आल्यावर आर्यन आणि तृप्ती पोटभर जेवले .आज तर चक्क एक-एक पोळी शिल्लक खाल्ली त्या दोघांनी, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून आपण त्यांच्या हातात मोबाइल देऊन त्यांना game खेळाला शिकवल्याची चूक मला दिसली…

आता रोज आम्ही सकाळी त्या वडाच्या झाडाखाली खेळण्यासाठी जात असतो त्याना वेगवेगळे खेळ शिकवत असतो . आता मुलेही खूप खुश आहे आणि ते वडाचे झाडही….
So nice yar ,well done Tushar🙌💥🔥
Thanks महादेव 😊
So nice yar ,well done Tushar🙌💥🔥
Kup jabardast mitra
Tuze kup abhinandan ankhi ashich pragati kart😍✌️✌️👌👌
धन्यवाद भावा ..
Pingback: | चिमणीचे पिल्लू . – Shetkari Katta